इंदापूर तालुक्यातून पदवीधरसाठी ५७.६० तर शिक्षक मतदार संघासाठी ८३.६६ टक्के मतदान महाविकास आघाडी का भाजपा मारणार बाजी!श्रीमंत कोकाटे यांचा करिश्मा चालणार का?
राज्यमंत्री भरणे व माजी मंत्री पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
इंदापूर तालुक्यातून पदवीधरसाठी ५७.६० तर शिक्षक मतदार संघासाठी ८३.६६ टक्के मतदान महाविकास आघाडी का भाजपा मारणार बाजी!श्रीमंत कोकाटे यांचा करिश्मा चालणार का?
राज्यमंत्री भरणे व माजी मंत्री पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी इंदापूर तालुक्यात सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली.इंदापूर तालुक्यातील प्रामुख्याने निमगाव व इंदापूर केंद्रावर गर्दी दिसून येत होती.
यावेळी प्रामुख्याने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करून तापमान व ऑक्सिजनची लेवल चेक करून मतदारांना मतदानासाठी सोडले जात होते.
इंदापूर तालुक्यातून शिक्षक मतदार संघासाठी १२२४ पैकी १०२४ (८३.६६ )टक्के मतदान तर पदवीधर साठी १०८५७ पैकी ६२५४ (५७.६०) टक्के मतदान झाले.
पदवीधर साठी तालुक्यातील इंदापूर केंद्रावर २३९३ ,बावडा १५८५ , निमगाव ११६९ , सणसर ६१३ , भिगवण ४९४ असे एकूण १०८५७ पैकी ६२५४ (५७.६०)टक्के मतदान झाले
तर शिक्षक मतदार संघातील इंदापूर केंद्रावर ३६० , बावडा २०९ , निमगाव २५७ , सणसर १२८ , भिगवण ७० असे एकूण १२२४ पैकी १०२४ ( ८३.६६ ) टक्के मतदान झाले आहे.
गेल्या अनेक शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूका पाहता या निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.यंदाच्या पदवीधर शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणूकीत मतदारांचा उत्साह अधिक पाहायला मिळाला असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून महाविकास आघाडी का भाजपा त्यांच्या अधिकृत उमेदवारांना आघाडी मिळवून देणार का श्रीमंत कोकाटे यांचा करिश्मा चालणार हे येत्या ३ डिसेंबर रोजी पहावयास मिळणार असून राज्यमंत्री भरणे व माजी मंत्री पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.