इंदापूर
इंदापूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा कहर… ट्रॅक्टरची लाईट पोलला धडक…
दोन गावांचा वीजपुरवठा खंडित…

इंदापूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा कहर… ट्रॅक्टरची लाईट पोलला धडक…
दोन गावांचा वीजपुरवठा खंडित…
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील वनगळी पारेकर वस्ती परिसरात मध्यरात्री अज्ञातांकडून वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू होती. याच दरम्यान वाळू भरलेल्या ट्रॅक्टरचा रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईटच्या पोलला जोरदार धडक बसली.
या अपघातात विद्युत पोल मोडून खाली पडले आणि पोलांवरील तारा एकमेकांवर पडल्याने, तसेच शेताच्या कडेला केलेल्या संरक्षण ताराही तुटल्यामुळे, रात्रीपासून परिसरातील दोन गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.






