कोरोंना विशेष
इंदापूर तालुक्यात आज पुन्हा कोरोनाचे नवे पाच रुग्ण.
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ.
इंदापूर तालुक्यात आज पुन्हा कोरोनाचे नवे पाच रुग्ण.
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ.
इंदापूर:-प्रतिनिधी
दि.4 ऑगस्ट रोजी तालुक्यात 12 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले असतानाच काल घेण्यात आलेल्या 32 स्वॅब पैकी आज सकाळी 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली असून यामध्ये इंदापूर शहरातील 1 , निमगाव केतकी येथील 2 ,व भिगवण येथील 2 असे एकूण पाच पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पाहता शासनाने घालून दिलेले नियम व अटी यांचे तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.