इंदापूर तालुक्यात डाळिंब चोरीची घटना— ३५० क्रेट डाळिंबावर चोरट्यांचा डल्ला..
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल एक लाखांचे डाळिंब गायब — अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर तालुक्यात डाळिंब चोरीची घटना— ३५० क्रेट डाळिंबावर चोरट्यांचा डल्ला..
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल एक लाखांचे डाळिंब गायब — अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल एक लाख रुपये किमतीचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी विठ्ठल तुकाराम चव्हाण यांच्या शेतातून २५० क्रेट तर शेजारील शेतकरी मोहन हनुमंत बोराडे यांच्या शेतातून १०० क्रेट डाळिंबाची चोरी झाली असून, एकूण १ लाख रुपयांहून अधिक मालाची चोरी झाली आहे.
पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोसावी या प्रकरणाचा तपास करत असून परिसरात वाढत्या डाळिंब चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे…