
इंदापूर तालुक्यामध्ये पुन्हा कोरोनाचा कहर.
नव्याने १४ रुग्ण आले आढळून.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी ).
इंदापूर तालुक्यात माघील दोन दिवसात तब्बल वीस रुग्ण आढळून आले होते,त्यांच्या संपर्कातील तब्बल ६१ व्यक्तींचे स्वब घेण्यात आले होते, त्यापैकी आज दि.१७ जुलै रोजी तालुक्यातील १४ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यामध्ये इंदापूर शहरात चार,कळंब येथील एक, निमगाव केतकी येथील तीन, वरकुटे येथील पाच व अकोले येथील एका रुग्णाचा समावेश आहे अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.