
इंदापूर नगरपरिषदेचा १०० कोटी चा अर्थसंकल्प जाहीर
सन २०२१-२२ साठी केल्या महत्वाच्या तरतुदी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेचा कोणताही करवाढ नसलेला व नागरीकांसाठी करसवलती देण्यात आलेला रूपये १०० कोटी २० लाख रुपयेचा, ९.५६ लक्ष शिलकीचा सन २०२१-२२ चा अर्थ संकल्प नुकताच एकमताने मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली. इंदापूर नगरपरिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली.या सभेस उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेता कैलास कदम,गजानन गवळी,विरोधी पक्षनेता पोपट शिंदे,सर्व विभागाचे सभापती,नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी निर्मला राशीनकर व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.सभेचे कामकाज अधिक्षक गजानन पुंडे यांनी पाहिले.
सन २०२१-२२ साठी या आहेत महत्वाच्या तरतुदी :
२०२१-२२ अर्थसंकल्पात रमाई आवास लाभार्थ्यांसाठी व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना भोगवटा दाखला, स्करुटिनी फी मध्ये ५० टक्के सुट देण्यात आली आहे. बांधकाम परवानगी स्कॅनींग फी मध्ये ही कपात करण्यात आली असून अत्यल्प दर ठेवण्यात ले आहेत. पंधरावा वित्त आयोग अंतर्गत नगरपरिषदेतील रेकॉर्डचे स्कॅनिंग व डिझीटलायजेशन साठी रू नाख तरतूद करण्यात आली आहे.तर घनकचरा व्यवस्थापनासाठी रू. १ कोटी २० लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. पंधरावा वित्त आयोग निधी मध्ये 3 कोटी रक्कमेची तरतूद करण्यात आली असून नगरोत्थान योजनेच्या लोकवर्गणीसाठी रू.५० लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना ( नागरी दलितवस्ती योजना) अंतर्गत प्रस्तावीत कामासाठी रू. २ कोटी रकमेची तरतुद केली आहे.रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत रू २ कोटी ५० लाख रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत क्रिडांगण व इतर कामासाठी रू. १० कोटी मंजूर करण्यात आला आहे.नागरी दलितेत्तर योजना अंतर्गत सन २०२१-२२ साठी रू. २ कोटी रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे.स्थानिक विकास आमदार /खासदार) मधून रू.२ कोटी रकमेचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
अग्निशमन योजने अंतर्गत रू. १० लाख रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत रू. २ कोटी रकमेचा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे.स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत रू. ७.५० कोटी रकमेचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.