इंदापूर नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर
२० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३) नूतन नगरपरिषद प्रशासकीय भवन इंदापूर या ठिकाणी जाहीर झाली.त्यानुसार १० प्रभागातील एकूण २० जागांपैकी १० जागा महिलांसाठी राखीव असतील.
इंदापूर नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र. १ : अ) अनुसुचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र.२ अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र.५ : अ)सर्वसाधारण स्त्री,ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ६ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण , प्रभाग क्र. ७ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र. ८ : अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ९ : अ ) अनुसूचित जाती स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० : अ)अनुसूचित जाती सर्वसाधारण,ब) सर्वसाधारण स्त्री.
सदरील अनुसूचित जाती आरक्षण सोडतीच्या तीन राखीव जागांसाठी चैतन्य राजेंद्र धोत्रे या विद्यार्थ्यांच्या हातून सोडतीच्या चिट्टया काढण्यात आल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे,तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांसह आजी-माजी नगरसेवक, शहरातील नागरिक,नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.