इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पक्की घरे बांधून देण्याची ‘बीएमपी’ची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन
इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पक्की घरे बांधून देण्याची ‘बीएमपी’ची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना जागा उपलब्ध करून पक्की घरे बांधून देण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टी कडून करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२९) बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
या संदर्भात बोलताना बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर म्हणाले की, नगरपरिषदेतील काही सफाई कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत,ज्यांना घरे आहेत ती पक्क्या स्वरूपाची नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशपातळीवरील चार वेळा पारितोषिके मिळाली.इंदापूरचे नाव देशपातळीवर उंचावले तसेच करोडो रुपयांचा निधी नगरपरिषदेला मिळाला आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटी अथवा शर्ती न लावता नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून कर्मचाऱ्यांना पक्की घरे बांधून द्यावीत. या मागणी बाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून नगरपरिषदेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देखील क्षीरसागर यांनी दिला आहे.