इंदापूर

इंदापूर नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने बहुजन मुक्ती पार्टीने गाढवापुढेच मांडल्या व्यथा

गाढवाच्या गळ्यात मुख्याधिकारी नावाची पट्टी टाकत बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापुरात हटके आंदोलन

इंदापूर नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने बहुजन मुक्ती पार्टीने गाढवापुढेच मांडल्या व्यथा

गाढवाच्या गळ्यात मुख्याधिकारी नावाची पट्टी टाकत बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापुरात हटके आंदोलन

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर नगररिषदेला गेल्या दोन महिन्यांपासून नियमित मुख्याधिकारी नसल्याने बहुजन मुक्ती पार्टीने गाढवाच्या गळ्यात नमस्कार मी इंदापूरचा नवीन सीओ,आज पासून सर्व कामे पूर्ण वेळ उपस्थित राहून करीन अशा पद्धतीचा मजकूर असलेली पट्टी टाकून इंदापूर नगरपरिषदेच्या समोर गाढवाला हार घालत हटक्या पद्धतीने आंदोलन केले.

गेल्या दोन महिन्यांपासून इंदापूर नगरपरिषदेला नियमित मुख्याधिकारी नाही.प्रभारी मुख्याधिकारी म्हणून दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी काम पहात आहेत.परंतु त्या इंदापूरला येत नसल्याने शहरातील नागरिकांना अडचणी येत असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे म्हणणे असून इंदापूर नगरपालिकेला तात्काळ नियमित मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

तसेच मुख्याधिकारी त्वरित नियुक्त न केल्यास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने नागरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

यावेळी भारत मुक्ती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे,बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग,बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी तालुकाध्यक्ष राहुल शिंगाडे,बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष आझाद सय्यद, भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष नागेश भोसले, भारतीय विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चा पुणे जिल्हा प्रभारी सुरज धाईंजे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहित ढावरे,ऍड.सुरज मखरे,भारत मुक्ती मोर्चाचे इंदापूर शहर उपाध्यक्ष नितीन देशमाने,उमेश ढावरे,बलभीम राऊत,विकास गोळे,इम्रान बागवान उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram