आपला जिल्हा

इंदापूर नगरपालिका 2025 : प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवारांनी प्रचारात घेतला वेग 

अपक्ष उमेदवारांची प्रचारात मुसंडी 

इंदापूर नगरपालिका 2025 : प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवारांनी प्रचारात घेतला वेग 

अपक्ष उमेदवारांची प्रचारात मुसंडी

इंदापूर :

इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (AP) गटाचे उमेदवार गणेश पाटील, कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार गणेश राऊत आणि अपक्ष उम `दवार शेखर पाटील यांच्यात (३ अ) या जागेसाठी सरळ लढत होत आहे. तर (३ ब) या जागेसाठी राष्ट्रवादीच्या वंदना शिदे, कृष्णा भिमा विकास आघाडीच्या पुष्पा शिंदे, आणी अपक्ष म्हणुन मनिषा शिंदे यांच्यात सरळ तिरंगी लढत होत असुन सध्या अपक्ष उमेदवार शेखर अशोक पाटील व मनिषा पांडुरंग शिंदे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसुन येत आहे.

नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही गटानी यावेळी सर्वाधिक नवख्या व युवा उमेदवारांना संधी दिल्याचे दिसुन येत आहे. सध्या वार्ड निहाय प्रचार सुरू आहे.अपक्ष उमेदवार शेखर पाटील (शिट्टी) व मनिषा पांडुरंग शिंदे यांना (छताचा पंखा) गेल्या चार दिवसांपूर्वी अधिकृत चिन्ह मिळाले असून त्यामुळे सध्या मतदाराच्या घरोघरी जावुन भेटी गाठीचा प्रचार सुरू आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये अपक्ष उमेदवार मनिषा पांडुरंग शिंदे व शेखर पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन त्यांनी प्रभागातील प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देवुन मतदारांशी संपर्क साधला आहे. मनिषा शिंदे व शेखर पाटील हे दोघे अपक्ष निवडणुक लढवत असुन हे दोघेही माजी नगरसेवक असल्याने त्यांना प्रचाराचा दांडगा अणुभव असुन त्यांनी प्रचारात वेग घेतल्याचे दिसुन येत आहे.

Back to top button