इंदापूर पोलिसांची अवैद्य गुटख्यावर एका महिन्यात दुसरी मोठी कारवाई
सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर पोलिसांची अवैद्य गुटख्यावर एका महिन्यात दुसरी मोठी कारवाई
सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहर बाह्यवळन मार्गालगत सोलापूर पूणे हायवे रोडवर ९ जानेवारी रोजी पहाटेच्या वेळी पॅकबाॅडी कंटेनर व ऊस वाहतुक ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. अपघातात कंन्टेनर चालक हा गंभिर जखमी झाल्याने त्याला पूणे येथील ससुन रूग्णांलयात दाखल करून इंदापूर पोलीसांनी अपघातग्रस्त कंटेनर इंदापूर पोलीस ठाण्यात आणुन लावला.पाच दिवसांनी कंटेनरमधील मालाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये २२ लाख रू.कंमतीचा ४५ पोती अवैध गुटखा मिळुन आल्याची माहिती इंदापूरचे पोलीस निरिक्षक तयूब मुजावर यांनी दिली.
याबाबत पो.शि.सुहास सिकंदर आरणे (वय ३१) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, मौजे सरडेवाडी (ता.इंदापूर) गावचे हद्दीतील सी.एन. जी पेट्रोल पंपासमोरिल सोलापूरहून पुण्याला जाणार्या लेनवर दि.९ रोजी पहाटे ५ वा.चे दरम्यान कंटेनर नं.केए,०१,ए एफ.३३९६ व ऊस वाहतुक ट्रॅक्टर यांचा अपघात होऊन अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.सदर अपघातातील जखमी हनिप सय्यद रा.बेंगलोर यास अपचारासाठी पूणे येथे दाखल करून कंटेनर इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतला होता.
अपघातग्रस्त कंटेनरचा मालक अथवा इतर कोणीही पोलीस स्टेशनला न आल्याने पोलीसांचा संशय बळावला व त्यांनी दि.१२ जानेवारी रोजी रात्री कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता सदरचे पॅकबाॅडी कटेनरमध्ये पांढरे रंगाचे प्लास्टिकचे गोण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला आर.के.प्रिमीअर कंंपनीचा ४५ पोती गुटखा मिळुन आला.सदर मालाची किंमत २२ लाख २७ हजार ५०० रूपये इतकी आहे.तर कंटेनरची किंमत २५ लाख असा एकुण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई ही पूणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमख व बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांचे नेतृृत्वाखाली सहा.पो.निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहा.पो.नि.दत्तात्रय लिगाडे, सहा.पो.नि.महेश माने,.स.इ.दाजी देठे,पो.हवा.बालगुडे,पो.ना.मल्हारे, पो.शि.चौधर,पो.ना.जाधव,पो.ना.सलमान खान,पो.शि.नरळे यांचे पथकाने केली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.