इंदापूर

इंदापूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ; दरोड्यातील आरोपी पाठलाग करून पकडले

दोन आरोपींच्या मुसक्या आवळून स्कॉर्पिओ गाडी घेतली ताब्यात

इंदापूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ; दरोड्यातील आरोपी पाठलाग करून पकडले

दोन आरोपींच्या मुसक्या आवळून स्कॉर्पिओ गाडी घेतली ताब्यात

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर येथील डोंगरेवस्ती येथे घरावर दरोडा टाकून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या मुसक्या इंदापूर पोलिसांनी आवळल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील मौजे लोणी देवकर डोंगरे वस्ती येथून रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घरावर दरोडा टाकून आरोपी तेथून पसार झाले. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी ताबडतोब पोलीस यंत्रणा सतर्क करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान सदरील घटनेबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सरडेवाडी टोलनाक्यावर सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता ज्या गाडीतून दरोडेखोर पसार झाले होते ती गाडी निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा शोध घेत पाठलाग केला असता करमाळा तालुक्यातील खांबेवस्ती येथे दोन दरोडेखोरांसह पांढऱ्या रंगाची एम.एच १३ एसी ०२९६ गाडी ताब्यात घेतली आहे.

सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पो.ना सलमान खान,पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, पो.कॉ विकास राखुंडे, जगदीश चौधर,विशाल चौधर,आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button