इंदापूर

इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई ; २० लाख रुपयांचा गुटखा पकडला

वाहन चालकास घेतले ताब्यात

इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई ; २० लाख रुपयांचा गुटखा पकडला

वाहन चालकास घेतले ताब्यात

इंदापूर : प्रतिनिधी

पुणे सोलापूर महामार्गांवर इंदापूर डोंगराई सर्कल या ठिकाणी इंदापूर पोलिसांनी गुटख्याने भरलेला आयशर टेम्पो शुक्रवारी पहाटेच्या सुमारास (दि.१८) पकडला.या कारवाईत टेम्पोसह सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास गस्त घालत असताना सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात असणारा आयशर टेम्पो (के.ए ०१ ए.एल ९१२१) संशयास्पद वाटल्याने इंदापूर बायपास या ठिकाणी थांबवून चौकशी केली असता मानवी जीवनास अपायकारक असणारा व शासनाने बंदी घातलेला आर. के कंपनीचा ४५ बॉक्स गुटखा आढळून आला. त्यानुसार गाडी चालक व मालक यांच्या विरोधात कलम ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, पो.ना सलमान खान, पो. ना. मोहिते,पो.कॉ.काळे, पो.कॉ. विकास राखुंडे, महिला पो.ह. शुभांगी खंडागळे आदींनी केली आहे.

Related Articles

Back to top button