इंदापूर पोलिसांची वाळू माफियांवर कारवाई ; तिघांना ठोकल्या बेड्या
४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर पोलिसांची वाळू माफियांवर कारवाई ; तिघांना ठोकल्या बेड्या
४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहा गावच्या परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या तीन वाळू माफियांना इंदापूर पोलिसांनी अटक केली असून तब्बल ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मौजे शहा गावच्या हद्दीत नदी परिसरात सोमवारी ( दि.६) रात्री इंदापूर पोलिसांनी अचानक पणे टाकलेल्या धाडीत तीन वाळू माफियांना ताब्यात घेत एक मोठी वाळू उपसा करणारी बोट, वाळू उपशासाठी लावण्यात आलेले इंजिन, सेक्शन बोट, वाळू उपशासाठी लागणारी यंत्रसामग्री असा एकूण ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्युब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलीस नाईक मनोज गायकवाड,पोलीस नाईक सलमान खान, पो.कॉ. प्रवीण शिंगाडे यांनी केली आहे.