इंदापूर
इंदापूर पोलिसांनी गांजा वाहतूक करणाऱ्या एकास घेतले ताब्यात
आरोपीला चार दिवसांची पोलीस कस्टडी

इंदापूर पोलिसांनी गांजा वाहतूक करणाऱ्या एकास घेतले ताब्यात
आरोपीला चार दिवसांची पोलीस कस्टडी
बारामती वार्तापत्र
इंदापूर शहर पोलीस स्टेशनच्या रात्रपाळी गस्ती पथकाकडुन इंदापुर-बारामती बायपास चौकामध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना रात्री होन्डा अँक्टीव्हा स्कुटी गाडीवरून प्रवास करणाऱ्या इसमाच्या स्कुटी गाडीची (एम.एच.१२, एस.टी. ८५५१)पोलीसांनी तपासणी केली असता गाडीच्या डीक्कीत अर्धा किलो वजनाचा दहा हजार रूपये किमतीचा गांजा आढळुन आला असुन सदर प्रकरणी आदर्श चंद्रकांत सागळे.रा.मंगळवार पेठ , भोर,ता. भोर, जि.पूणे. याचेवर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन इंदापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.