इंदापूर पोलीसांनी लोणी देवकर एमआयडीसीतील एका कंपनीतील बेकायदा ऑक्सिजन सिलेंडर साठा केला जप्त
एकुण किंमत ७,५५,७००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इंदापूर पोलीसांनी लोणी देवकर एमआयडीसीतील एका कंपनीतील बेकायदा ऑक्सिजन सिलेंडर साठा केला जप्त
एकुण किंमत ७,५५,७००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इंदापूर;बारामती वार्तापत्र
आज दिनांक २६/०४/२०२१ रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन इंदापूर पोलीसांनी लोणी देवकर या MIDC मधील Y-Axis Structural Steel Pvt. Ltd या कंपनीत छापा टाकलेनंतर 51 भरलेले सिलेंडर व 21 रिकामे ऑक्सिजन सिलेंडर मिळुन आले आहेत.
कंपनीतील स्टाॅकवरून माहे एप्रिल २०२१ महीन्यात एकुण १७९ सिलेंडर ची आवक झाली असुन त्यामध्ये एकुण १२५३ क्युबेक मिटर इतका ऑक्सिजन आणला गेला आहे. तो कोठुन आणला याबाबत अधिक विचारपूस चालू आहे.
सदर मिळुन आलेल्या साठ्याबाबत तहसिलदार व प्रांत सो यांना कळवले असुन इंदापूर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, बिट अंमलदार दिपक पालके, मोहंमद अली मड्डी, अमोल गारुडी, विनोद मोरे, विक्रम जमादार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकुण किंमत ७,५५,७००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.