इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाळू तस्कर सहा महिन्यांसाठी तडीपार
५० ते ६० गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर
इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वाळू तस्कर सहा महिन्यांसाठी तडीपार
५० ते ६० गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीतील उजनी जलाशयातून वाळू तस्करी करून वाहतूक करणे तसेच गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोळा करून गावात गुन्हे घडवीत असलेल्या तिघांना सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर,दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत,जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातुन सहा महिन्यांकरीता तडीपार करण्यात आले आहे.
यामध्ये टोळी प्रमुख योगेश नंदू जगताप ( वय २८ ) रा.हिंगणगाव,सौदागर बाळासाहेब ननवरे ( वय २९ ) , सुरक्षित वसंत राखुंडे ( वय ३१ ) दोघे रा. कांदलगाव ता.इंदापूर हे इंदापूर शहर व तालुक्यातील आसपासच्या साथीदारांना एकत्रित करून उजनी जलाशयातून बेकायदा वाळू उपसा करीत होते.
पुढील काही दिवसात गणेशोत्सवच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तसेच अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या ५० ते ६० गुन्हेगारांची कुंडली पोलिसांकडून तयार करण्यात आली असून त्यांच्यावर तडीपार,मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उपविभागीय अधिकारी नारायणराव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तयूब मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, पोलीस उप निरीक्षक लिंगाडे, पो.हवालदार भोईटे,पो.ना मोहिते,पो.ना मोहळे, पोलीस नाईक चौधर,पो.ना चौधर,पो.ना चव्हाण,पो.कॉ कोठावळे,पो.कॉ आरणे,पो.कॉ केसकर यांनी केली आहे.