इंदापूर प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची केली मागणी.
इंदापूर प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन
शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची केली मागणी.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी.तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या प्रमुख मागणीच्या संदर्भात माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तहसील कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.