इंदापूर

इंदापूर-बारामती रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू

गोखळी हद्दीत झाला अपघात

इंदापूर-बारामती रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू

गोखळी हद्दीत झाला अपघात

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर बारामती रस्त्यावर कोल्ह्याचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.ही घटना गोखळी ता.इंदापूर या ठिकाणी शनिवारी (दि.५) घडली. सदरील घटनेची माहिती वन विभागाला कळताच वनपाल व्ही.एस खारतोडे,वनरक्षक डी.बी गवळी,वन कर्मचारी राजू वाघमोडे,तुकाराम शेंडे,सुरेश पवार,सुभाष काळेल,बाळासाहेब वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

याबाबत तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी यांना विचारले असता ते म्हणाले की,इंदापूर बारामती रस्त्यावर गोखळी,तरंगवाडी,सोनाई माथा या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वनक्षेत्र आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांचा दोन्हीं बाजूंना वावर असतो.रस्ता ओलांडताना सदरच्या कोल्ह्याचा मृत्यू झाला असावा.मृत कोल्ह्याची शविच्छेदनानंतर नियमांप्रमाणे विल्हेवाट लावण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे.

भरधाव वेगात सुटणाऱ्या वाहनांच्या अपघातात वन्यप्राणी आपला जीव कायमचा गमवून बसतात. दरवर्षी लाखोपेक्षा जास्त प्राण्यांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही गांभीर्याने घेणारी बाब आहे.शासनाने संरक्षित वनक्षेत्राप्रमाणेच असंरक्षित असलेल्या वनक्षेत्राकडेही लक्ष देण्याची गरज आहे असे मत वन्यजीव प्रेमी व दंडकारण्य फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. समिरण पोळ यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button