इंदापूर महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रास बीसीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता.
परिसरातील विद्यार्थ्यांना होणार फायदा.
इंदापूर महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रास बीसीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता.
परिसरातील विद्यार्थ्यांना होणार फायदा.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रास बीसीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे.
माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ही मान्यता मिळाली.
बी.सी. ए या अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण किंवा दोन वर्षाचा आयटीआय उत्तीर्ण किंवा पूर्वतयारी उत्तीर्ण असल्यास प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल तसेच थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असेल तर दहावीनंतर चा कॉम्प्युटर किंवा आयटी विभागातून डिप्लोमा उत्तीर्ण असेल तर थेट द्वितीय वर्ष बीसीए अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
त्याचप्रमाणे एमसीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा असेल तर नामांकित विद्यापीठाची तीन वर्षाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बारावी गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एमसीए थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा असेल तर तीन वर्षाची कॉम्प्युटर सायन्स संबंधित पदवी उत्तीर्ण किंवा बी. ई. (कॉम्प्युटर किंवा आयटी किंवा बी. टेक ) मधील पदवी उत्तीर्ण असेल तर थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो.
बीसीए व एमसीए या अभ्यासक्रमाचे प्रवेश मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयाशी संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा.
या अभ्यास केंद्रामध्ये बीसीए व एमसीए बरोबरच बीए., बीकॉम., एम.ए , एम. कॉम., एम.बी.ए., बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, जर्नालिझम इत्यादी अभ्यासक्रम देखील नियमित सुरू असल्याची माहिती केंद्र संयोजक प्रा. युवराज फाळके, केंद्र सहाय्यक प्रा. रवींद्र साबळे यांनी दिली.