इंदापूर महाविद्यालयाच्या ‘फ्लेमिंगो’ नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव
इंदापूर महाविद्यालयाच्या ‘फ्लेमिंगो’ नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव
इंदापूर : प्रतिनिधी
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी असणारे अव्यवसायिक विभागातील विद्यापीठ स्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या फ्लेमिंगो या नियतकालिकास मिळाले.तसेच सन २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी प्रभावी अंमलबजावणी करणारे महाविद्यालय म्हणून जिल्हास्तरीय ( पुणे ग्रामीण ) पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह १५ हजार व ७ हजार ५०० रोख रक्कम अनुक्रमे देऊन गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास महामंडळाकडून दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी विद्यापीठात सन्मान सोहळा पार पडला.सदरील सन्मान इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य व फ्लेमिंगोचे संपादक डॉ.संजय चाकणे, कार्यकारी संपादक डॉ.राजाराम गावडे,डॉ.तानाजी कसबे,डॉ.बाळासाहेब काळे,दादा कांबळे यांनी स्वीकारला. यावेळी कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे,डॉ. विलास उगले आणि विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या यशाबद्दल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व संस्थेचे सर्व संचालक मंडळाने या सर्वांचे कौतुक केले.