इंदापूर महाविद्यालयात 12 जानेवारी रोजी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन
इंदापूर महाविद्यालयात 12 जानेवारी रोजी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन
इंदापूर प्रतिनिधी –
शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर आयोजित रविवार (दि.12 ) जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात सरदार कान्होजी जेधे यांचे 14 वे वंशज युवराज यशवंतराव जेधे व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार , पवारवाडी यांच्या वीरपत्नी सौ. सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच कामधेनू सेवा परिवारचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी सर्व आजी-माजी सैनिक , एस. पी.आर .एफ ., सी. आर. पी. एफ. यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन शिवभक्त परिवार इंदापूर यांच्यावतीने करण्यात येणार आहे.
यावेळी शिवप्रताप मर्दानी आखाडा पंधारवडी ता. इंदापूर यांचे मर्दानी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकाचे सादरीकरण होणार आहे तसेच सरदार कान्होजी जेधे यांच्या शिवकालीन तलवारीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
शिवभक्त परिवार व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.