इंदापूर येथील कुल्फी कारखान्यास भीषण आग
लाखो रुपयांचे नुकसान
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील आंबेडकर नगर परिसरात असणाऱ्या कुल्फी कारखान्यास दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कुल्फी कारखान्यामध्ये असणाऱ्या दोन पिकअप गाड्या जळाल्या असून शेजारीच असणाऱ्या किराणा दुकानासह पिठाची गिरण तसेच सर्व काही आगीत नष्ट झाले आहे.
सदरील ठिकाणी इंदापूर नगरपरिषेची अग्निशमन गाडी दाखल झाली असून आग विझवण्याचे काम शर्तीने युद्धपातळीवर चालू आहे.सदरील आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.
आगीत कुल्फी कारखान्यामध्ये असणारी साधन सामग्री त्याबरोबरच गाड्या, किराणा दुकान,पीठ गिरणी पूर्णहतः नष्ट झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.दरम्यान स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेने तसेच अग्निशमन दल दाखल झाल्याने मोठी हानी टळली आहे.