इंदापूर

इंदापूर येथील नुतन न्यायालयीन इमारतीचे रविवारी आभासी पध्दतीने होणार उद्घाटन

उद्घाटनाच्या कार्यक्रमास आभासी पध्दतीने उपस्थित राहण्याचे आवाहन

इंदापूर येथील नुतन न्यायालयीन इमारतीचे रविवारी आभासी पध्दतीने होणार उद्घाटन

उद्घाटनाच्या कार्यक्रमास आभासी पध्दतीने उपस्थित राहण्याचे आवाहन

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि.६) दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मा. न्यायमूर्ती श्री.नितीन जामदार साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते आभासी पध्दतीने होणार आहे.

सदर कार्यक्रम हा मा.न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदर कार्यक्रमास आभासी पध्दतीने प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

तसेच विधी व न्याय विभाग राज्यमंत्री
आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.संजय देशमुख साहेब, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीने कोविड- १९ च्या नियमांचे पालन करुन उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी, उद्घाटनाच्या कार्यक्रमास आभासी पध्दतीने उपस्थित रहावे असे आवाहन मा.पी.एल.पाटील, दिवाणी न्यायाधीश क स्तर, इंदापूर व ॲड. पी.व्ही. खरात, अध्यक्ष, वकील संघ, इंदापूर यांनी केले आहे.

सदर आभासी तंत्रज्ञानाची Youtube link लिंक

Related Articles

Back to top button