इंदापूर येथे अल्पशी विश्रांती घेत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना
संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पादुका पांडुरंगाच्या नामघोषात पंढरीकडे मार्गस्थ
इंदापूर येथे अल्पशी विश्रांती घेत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना
संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पादुका पांडुरंगाच्या नामघोषात पंढरीकडे मार्गस्थ
इंदापूर: सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोरोनाची परिस्थिती असली तरी देखील आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रमुख मानाच्या १० पालख्यांना शिवशाही बसमधून पंढरीकडे येण्याची परवानगी दिली आहे. त्या मधील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी सोमवारी ( दि.१९ ) दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात काही वेळ विसाव्यासाठी थांबली. मात्र यंदा देखील गेल्यावर्षी प्रमाणेच कोरोनाची साथ असल्याने पालखी मुक्कामी न थांबता काही क्षणात मार्गस्थ झाली.
फुलांनी सजवलेल्या विशेष शिवशाही बसमधून पालखी वारीच्या इतिहासात दुसऱ्या वर्षी अशाप्रकारे बसमधून पांडुरंगाच्या भेटीला जाणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी राज्य सरकारने अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थित पालखीसह जाण्याची परवानगी दिली होती. यंदा मात्र ४० वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गस्थ होत आहे. विशेष म्हणजे पायी पालखी सोहळा लाखो वारकर्यांसह काही दिवसांनंतर पंढरीत पोहोचत असतो मात्र कोरोनाचे सावट असल्याकारणाने पालखी यंदा देखील अवघ्या काही तासातच पंढरपुरात दाखल होणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगराध्यक्षा अंकिता शहा, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वैद्यकीय अधिकारी एकनाथ चंदनशिवे,वैद्यकीय अधिकारी सुहास शेळके,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा,नगरसेवक स्वप्नील राऊत,मा.नगरसेवक प्रशांत शिताप,सुनिल मोहिते, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले,बाबासाहेब साळुंके,विकास खिलारे यांसह पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी,आरोग्य अधिकारी यांसह इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
या वेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे,अजित महाराज मोरे,संजय महाराज मोरे विश्वस्त विशाल मोरे, संतोष मोरे आणि माणिकराव मोरे यांसह बस मध्ये ४० वारकरी होते. उपस्थित सर्व वारकऱ्यांना प्रशासनाकडून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
प्रसंगी बोलताना सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे म्हणाले की,जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर कर हेच विठ्ठलाला साकडे आहे.