स्थानिक

वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे-उप प्रादेशिक परिवहन आधिकारी सुरेंद्र निकम

'रस्ता सुरक्षा अभियान २०२५'

वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे-उप प्रादेशिक परिवहन आधिकारी सुरेंद्र निकम

‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’

बारामती वार्तापत्र 

अपघातमुक्त प्रवास करणे ही आपली ज़बाबदारी आहे; वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन आधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ अंतर्गत दुचाकी व चारचाकी पक्की अनुज्ञाप्तीकरीता आलेल्या परीक्षार्थींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मोटर वाहन निरीक्षक नितीन घोडके, सहायक मोटर वाहन निरीक्षक हेमलता तावरे, राहुल नाझिरकर, रजत काटवटे, प्रियंका कुडले आदी उपस्थित होते.

श्री. निकम म्हणाले, वाहन चालविताना आपल्या पाठीमागे आपले कुटुंब असल्याची जाणीव ठेऊन सतर्क राहून वाहन चालवावे.

श्री. निकम यांच्या मोटर ड्रायव्हिंग शाळेतील वाहनांना घोषवाक्य स्वरूपी स्टिकर्स लावण्यात आले. सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती तावरे यानी ‘रस्ता सुरक्षा’ प्रतिज्ञा दिली.

Back to top button