इंदापूर येथे मोराचे अनोखे दर्शन.
इंदापूर चा मोर आंब्याच्या वनात नसून हा चक्क पेट्रोल पंपावरील एका खांबावर बसून पावसाचा आनंद घेत आहे.
इंदापूर येथे मोराचे अनोखे दर्शन.
इंदापूर चा मोर आंब्याच्या वनात नसून हा चक्क पेट्रोल पंपावरील एका खांबावर बसून पावसाचा आनंद घेत आहे.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच…
असे गाणे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत व गुणगुणत ही असतो हा मोर मात्र आंब्याच्या वनात नाचत नसून इंदापूर तालुक्यातील कुरवली गावातील असणाऱ्या पेट्रोल पंपावरील खांबावर बसून पिसारा फुलवून ढगाळ वातावरणाचा आनंद घेत नाचू पहात आहे.
त्यामुळे या परिसरात या मोराची चर्चा आहे आणि हे दृश्य पाहणारे मात्र आनंदीत झाले आहेत.
दिवसेंदिवस होत असलेली वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत असलेले आधुनिकीकरण या मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होत असून जंगल हे शहरात बदलत असलेले पहावयास मिळत आहे आणि याचाच परिणाम निसर्गावर होत असल्याचे दिसून येत आहे.
याचा परिणाम म्हणजे जंगलातील राहणारे पशु-पक्षी प्राणी लोकवस्तीत येत आहेत आणि त्यामुळे त्यांना धोका निर्माण होत असून दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत आहे.
सदरचा व्हिडीओ हा इंदापूर तालुक्यातील कुरवली या गावच्या एका पेट्रोल पंप येथील आहे.
लोकांच्या सोशल मीडियावर फिरत असून लोक त्याचा आनंद घेत आहेत.