इंदापूर

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून ध्वजास मानवंदना दिली.

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून ध्वजास मानवंदना दिली.

इंदापूर प्रतिनिधी: बारामती वार्तापत्र

रोजी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
हे वेळी जेष्ठ नेते प्रतापराव पाटील म्हणाले की, वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन अधिक मजबूत करून गावोगावी पक्षाच्या शाखा स्थापन करून शरदचंद्रजी पवार यांचे कार्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी अजून नेटाने सक्रीय राहण्याचे मत यांनी व्यक्त केले.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून ध्वजास मानवंदना दिली.

या प्रसंगी बोलताना हनुमंत कोकाटे यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मजबूत संघटन असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा पवार,
आदरणीय सुप्रियाताई सुळे तसेच आदरणीय ‌दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या बाबतीत इंदापूर तालुका नेहमीच अग्रेसर असुन या पुढील काळामध्ये सुध्दा विकासाचा वेग असाच ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव तत्पर असणार आहे.या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बंडगर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन दादा सपकळ,राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन बोगावत,दत्तात्रय (मामा) घोगरे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,शिवाजीराव पानसरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष सचिन खामगळ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप व्यवहारे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार,माजी कार्याध्यक्ष अमोल शेठ भिसे, जेष्ठ नेते किसनराव जावळे,सचिनभाऊ देवकर,नवनाथ आबा रूपनवर,सुरेश शिंदे सर,रमेश पाटील,तात्यासाहेब वडापूरे,अतुल मिसाळ, बाळासाहेब व्यवहारे,धनाजी थोरात,विलास ढोले,दत्तात्रय मोरे, नगरसेवक माळुंजकर साहेब,अनिकेत वाघ,पोपट शिंदे,अशोक मखरे सर,प्रशांत सिताप,अमर गाडे,अनिल राऊत,स्वप्निल राऊत,दिलीप वाघमारे,दादासाहेब सोनवणे, ब्रम्हदेव सपकळ,संजय कांबळे,अमोल भोंग,नागेश निकम,उदय घोगरे,सचिन काळे,दत्तात्रय घोगरे,काशिनाथ शेटे,यशवंत पाटील,योगेश माने,आण्णासाहेब धोत्रे,अक्षय राजेभोसले,दिनेश थोरात,अहमदराजा सय्यद,मुकुंद साळुंखे,स्मिता पवार,अश्विनी कुर्डे-राऊत,सागर पवार,अक्षय कोकाटे,नागेश धुमाळ,संजय रूपनवर,वासिम बागवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!