इंदापूर राजकारण रंगले शरद पवारांचा दौरा होताच आप्पासाहेब जगदाळेंनी केली भूमिका जाहीर…
नाराज असलेल्या आप्पासाहेब जगदाळेंचा आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा...हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून जगदाळेंनी केली होती नाराजी व्यक्त.……
इंदापूर राजकारण रंगले शरद पवारांचा दौरा होताच आप्पासाहेब जगदाळेंनी केली भूमिका जाहीर…
नाराज असलेल्या आप्पासाहेब जगदाळेंचा आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा…हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवरून जगदाळेंनी केली होती नाराजी व्यक्त.……
इंदापूर;प्रतिनिधि
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षातील नाराज असलेले इंदापूरातील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी मोठा राजकीय निर्णय घेतलाय. आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देणार आहेत.
आप्पासाहेब जगदाळे आता अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत शिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात जगदाळे आता दत्तात्रय भरणे यांचा प्रचार करणार आहेत. जनतेसमोर खोटं बोलणार्या व्यक्तीला साथ देणार नसल्याच सांगत त्यांनी हा निर्णय घेतलाय.जगदाळे यांच्या या निर्णयामुळे इंदापुरात शरद पवारांचा पक्ष फुटलाय…
शरद पवार यांनी आज इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ आप्पासाहेब जगदाळे व बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांना वगळता इतर नाराजांची व पाटील समर्थकांची भेट घेत पाटील यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन केले होते. त्यांचा दौरा संपताच जगदाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय…