इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर येथील लसीकरण मोहिमेचा ४२३ नागरिकांनी घेतला लाभ
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर येथील लसीकरण मोहिमेचा ४२३ नागरिकांनी घेतला लाभ
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी ‘एकच निर्धार कोरोना हद्दपार’ हे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर व्यंकटेशनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेत ४२३ नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या ठिकाणी पहिला,दुसरा व बूस्टर डोस देण्यात आला.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, उपाध्यक्ष महादेव लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते वसिम बागवान,साजन ढावरे,माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, श्रीधर बाब्रस,विकास खिलारे,अरबाज बागवान, सोहम मोहिते, अभिजीत सूर्यवंशी,सद्दाम बागवान, स्वप्नील उतेकर, दिपक उतेकर, हायुल बागवान, विजय मोरे, स्वप्नील उतेकर, राजू ढावरे, नदीम बागवान, जावेद शेख, कूष्णा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.सदरील लसीकरण मोहीमचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी केले.