कोरोंना विशेष
इंदापूर शहरात अजून दोन व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह.
कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण..
इंदापूर शहरात अजून दोन व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह.
कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण..
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
मंगळवार दि.७ रोजी इंदापूर शहरात बाब्रस गल्ली,कसबा येथे एक ३४ वर्षीय पुरूष रूग्ण पाँझिटिव्ह सापडला होता. त्याच्या संबंधित ११ जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात क्वारन्टाईन करण्यात आले होते व त्या संबंधित व्यक्तींची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती त्यापैकी त्यांची २७ वर्षीय पत्नी व १० वर्षाच्या मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित ९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे सत्र सुरूच असून लोकांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन संबंधित प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे