इंदापूर शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या; अज्ञात चोरांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने परिसरात घबराटीचे वातावरण
इंदापूर शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या; अज्ञात चोरांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने परिसरात घबराटीचे वातावरण
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
इंदापूर शहरातील आंबेडकर नगर व रामोशी गल्ली परिसरात (दि.४) रोजी रात्रीच्या सुमारास एकूण पाच ठिकाणी घरफोडी झाल्या असल्याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून परिसरातील नागरिकांनमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात सुनंदा भिमराव ओव्हाळ ( वय-५० वर्षे रा. आंबेडकर नगर,इंदापूर,जि, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.४ रोजीच्या रात्री ९ ते दि.५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ गौतम सदाशिव मखरे यांच्या घराचे कुलूप तोडून १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील वेल,१५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे दोन झुबे,३ हजार ५०० रु किंमतीचे चांदीचे पायातील पैंजन, २ हजार रु.रोख रक्कम असे एकूण ३५ हजार पाचशे रुपये किंमतीच्या चीजवस्तू घरफोडी करून चोरून नेहल्या आहेत.
तसेच रविंद्र महादेव भंडलकर (वय ३१ वर्ष,रा.रामोशीगल्ली,इंदापूर) सिंधू पंडित मखरे ( वय ३७ वर्षे, ) तानाजी राजाराम मखरे,हनुमंत मारुती ठोकळे ( वय ४१ वर्षे ) सर्व राहणार आंबेडकर नगर यांच्याही घरी चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हंटले असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.