इंदापूर शहरात कोरोना पसरतोय, आज पुन्हा नव्या रुग्णाची नोंद…
बायपास परिसरातील ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची ची लागण...
इंदापूर (प्रतिनिधी):- इंदापूर शहरात कोरोना सध्या पसरताना दिसत आहे पाच जूनला दर्गा मधील चौक, त्यानंतर कसब्या जवळील राम-वेस नाका, नंतर मंडई गल्ली व आता बायपास परिसर असा कोरोना शहरात हळूहळू पसरताना दिसत आहे.
बायपास परिसरातील ४५ वर्षीय महिलेला गेल्या दोन दिवसापासून त्रास होत होता, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाने त्यांचा अहवाल पाठविला असता काल उशिरा रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, हा रुग्ण शहरातील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील रूग्ण नसून या रुग्णाला नव्याने कोरोना ची लागण झाली आहे, सध्या प्रशासन या रुग्णाची ट्रॅव्हलिंग हिस्टरी चेक करत असून या रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेत आहेत..
दिवसेंदिवस शहरात कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने शहरवासियांना याची चिंता लागून राहिलेली आहे, असे असले तरी घाबरुन न जाता प्रशासनाने जे काही नियम दिले आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केले आहे.
इंदापूर तालुक्यात सध्या कोरोना ग्रस्तांची संख्या आता एकूण १८ झालेली आहे, यातील चार जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे, सध्या बारा जणांवर वरती उपचार सुरू आहेत तर दोघांचा मृत्यू झालेला आहे…
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहर आज व उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून त्यानंतर पुढील आठवडा म्हणजेच १९ जून ते २५जून पर्यंत शहरातील व्यवहार हा सकाळी नऊ ते दोन ठेवण्यात आला आहे..