इंदापूर शहरात चार तर जंक्शन मध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
कोरोनाची परस्थिती गंभीर
इंदापूर:-प्रतिनिधी.
इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील एकूण 30 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते,त्या पैकी आज (दि. 25) रोजी आलेल्या अहवालात एकूण 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे. त्यामध्ये इंदापूर शहरातील चार तर जंक्शन येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी भीती न बाळगता शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.