इंदापूर शहरात दूसरा कोरोनाचा रुग्ण आढळला…
३८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण..
इंदापूर (प्रतिनिधी) इंदापूर करांची चिंता वाढवणारी घटना घडलेली आहे, गेल्या दोन दिवसापासून इंदापूरकर ज्या चिंतेत होते त्या चिंतेत भर पडलेली असून इंदापुर शहरात आता नव्याने दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे,
काही दिवसापूर्वी इंदापूर शहरातील एक व्यक्ति सोलापूरला काही दिवस वास्तव्यास होती, ही व्यक्ती एक दिवस शहरात मुक्कामाला होती, व पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे पहिला रुग्ण शहरात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती, त्या रुग्णाच्या संपर्कातील 20 जणांचे स्वँब तपासणीसाठी पाठवल्यानंतर या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीश्या प्रमाणात इंदापूरकर यांना दिलासा होता, मात्र आता काल रात्री उशिरा शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात पुन्हा एकच खळबळ उडालेली आहे, इंदापूर शहरातील कसबा जवळील राम-वेस नाका परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, या महिलेला व तिच्या पतीला गेल्या दोन दिवसापासून कोरोणा आजारा ची लक्षणे आढळल्यामुळे इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या दोघांच्या घशाचे स्वँब घेतले होते, यात आता त्या ३८ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, या माहिलेची व तिच्या पतीची ट्रॅव्हलिंग हिस्टरी ची व त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती प्रशासन घेत आहे, शहरात हा दुसरा कोरोना चा रुग्ण आढळला आहे, सध्या कसबा व रामवेस नाका हा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात येत असून या भागात नगरपालिकेकडून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येणार आहे तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे अशी विनंती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केली आहे…