इंदापूर शहरात दोन तर लुमेवाडी येथील एकास कोरोनाची लागण.
वीस जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा.
इंदापूर शहरात दोन तर लुमेवाडी येथील एकास कोरोनाची लागण.
वीस जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा.
इंदापूर:-प्रतिनिधी
दि.7 ऑगस्ट रोजी बावीस जणांचा स्वॅब घेण्यात आला होता.त्यापैकी आज आलेल्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या व्यतिरिक्त एकाची रॅपिड टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्येत तीन ने भर पडली आहे.यामध्ये इंदापूर शहरातील दोन तर लुमेवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच एकूण वीस जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
तब्बल 20 जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असून इंदापूर शहरातील एका बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची प्राथमिक माहिती असून त्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.