इंदुरीकर महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य,कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही
कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले
इंदुरीकर महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य,कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही
कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले
प्रतिनिधी
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.निवृत्ती महाराज इंदोरीकर आपल्या नवनव्या वक्तव्यांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या पाठीमागचा वादाचा फेरा काही संपत नाही. पाठीमागे मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते वादाचं मोहोळ शांत होत नाही तोपर्यंत इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. नाशिक जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या सोहळ्यादरम्यान ‘कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही’, असं ते म्हणाले.
यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असं ते म्हणाले.
इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, दिग्गज डॉक्टर, लसीकरणासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमांवरुन तर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.