फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांनी गव्हाणी घुबडाला दिले जीवदान
घुबडाने पुन्हा घेतली गगन भरारी..

फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांनी गव्हाणी घुबडाला दिले जीवदान
घुबडाने पुन्हा घेतली गगन भरारी..
बारामती वार्तापत्र
जाळीत अडकलेल्या गव्हाणी घुबडाला बाहेर काढून त्यावर प्रथोमचार करून आकाशात पुन्हा मुक्त करुन जीवदान देण्यात आले आहे .
इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकीत फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य पिंटू भोंग हे शेतात काम करत असताना त्यांना व्याहाळी रोड लगत वनीकरणामध्ये पूर्ण वाढ झालेले गव्हाणी घुबड जाळीत अडकून जखमी झालेले दिसले. त्यांनी सुनील भोंग यांना मदतीला घेऊन कात्रीच्या साह्याने जाळ्यात गुंतागुंत होऊन अडकून पडलेल्या घुबडाला जाळीतून मुक्त करत किरकोळ झालेल्या जखमेला प्रथम उपचार केल्यानंतर त्यास पुन्हा आकाशात गगन भरारी घेण्यासाठी मुक्त केले.
गव्हाणी घुबड हे पाठी कडून सोनेरी बदामी आणि राखाडी रंगाचा असतो त्याच्यावर काळ्यापांढर्या रंगाचे पट्टे असतात पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात डोके गोलसर आकाराचे काहीसे माकडा सारखे असते. चेहर्याचा रंग पांढरा बदामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. भारतात याच्या मुख्य दोन उपजाती आहेत. उंदीर, घुशी, सरडे ,पाली हे गव्हाणी घुबड याचे मुख्य खाद्य आहे.