“इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये,” शिवरायांच्या समाधीबाबत राज ठाकरेंनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा : संभाजीराजे
शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, राज ठाकरेंच्या या विधानावर संभाजीराज यांनी म्हटलं, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत.
“इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये,” शिवरायांच्या समाधीबाबत राज ठाकरेंनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा : संभाजीराजे
शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात, राज ठाकरेंच्या या विधानावर संभाजीराज यांनी म्हटलं, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत.
मुंबई ;प्रतिनिधी
“इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये,” अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. “छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृत सांगू इच्छितो की शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही,” असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. ते दिल्लीत बोलत होते.
‘जबाबदार व्यक्तींनी इतिहासाबद्दल तथ्यांना धरून बोलावं. लोकमान्य टिळक यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे,’ अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज ठाकरे यांना फटकारलं आहे. तसंच महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधली आणि त्यानंतर तिथं पूजा सुरू झाली. त्यानंतर १९२५ मध्ये ही समाधी बांधली. शिवाजी महाराजांची समाधी बांधण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नसून सर्व शिवभक्तांचं आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. खासदार होताना माझी भूमिका स्पष्ट होती की छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची भूमिका ताकदीने मांडायची. आता कार्यकाळ संपल्यानंतरही ही शिव-शाहूंची भूमिका आणखी जोरदारपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असं ते म्हणाले.
‘इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये’
याविषयी संभाजीराजे म्हणाले की, “राज ठाकरे यांचं वक्तव्य इतिहासाला धरुन नाही हे स्पष्ट सांगतो. राज ठाकरे यांनी या विषयाचा नीट अभ्यास करावा. एखाद्या जबाबदार नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. इतिहास पूर्णपणे 100 टक्के माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये. मला तुम्ही इतिहास विचारलात तर तर मी अधिकृत सांगू इच्छितो की, शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही.”“हे श्रेय सगळ्या लोकांचं आहे. महात्मा फुलेंनी ही समाधी दिसली 1925 मध्ये ती बांधली. पण याचं संपूर्ण श्रेय हे शिवभक्तांचं आहे, वैयक्तिक श्रेय कोणाचंही नाही,” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं.