इंदापूर

इंदापूर भाजपकडून पंढरपूरच्या जाधव कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

हर्षवर्धन पाटील यांचेकडून कुटुंबियांचे सांत्वन

इंदापूर भाजपकडून पंढरपूरच्या जाधव कुटुंबीयांना दोन लाखांची मदत

हर्षवर्धन पाटील यांचेकडून कुटुंबियांचे सांत्वन

इंदापूर : प्रतिनिधी

वीज तोडणीमुळे निराश होऊन जीवनयात्रा संपविलेल्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील युवा शेतकरी सूरज जाधव यांच्या कुटुंबीयांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मगरवाडी येथे रविवारी (दि.13) भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने जाधव कुटुंबियांना रु. 2 लाखाची मदत सुपूर्त केली.

युवा शेतकरी सूरज जाधव यांनी वीज तोडणी मुळे हाताश होत विष प्राशन करतानाचा व्हिडिओ काढून आपली जीवनयात्रा संपली होती. मगरवाडी येथे सुरजचे वडील रामा जाधव आई सुनिता जाधव, भाऊ संतोष जाधव व जाधव कुटुंबीयांना भेटी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी दिलासा दिला व सहकार्य करू असे नमूद केले. शेतकरी व युवकांनी जीवन जगताना संयम बाळगावा, जीवनातील प्रत्येक अडचणीवर मार्ग हा असतो, जीवन एकदाच आहे याची जाणीव ठेवावी, असे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले. सदरची मदत जमा करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचेही सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार, मारुती वनवे, अँड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, देवराज जाधव, निवृत्ती गायकवाड, अशोक शिंदे, बापू जामदार, अतुर तेरखेडकर, राम आसबे, अमर काळकुटे, पवन घोगरे, सचिन सावंत, प्रवीण पवार, प्रशांत गलांडे तसेच भाजप किसान मोर्चाचे माऊलीभाऊ हळणवर, प्रणव परिचारक, दिलीप आप्पा घाडगे, कैलास खुळे, लक्ष्मणराव धनवडे, भास्कर कसगावडे, संदीप माने, धीरज माने, ज्ञानेश्वर गुंडगे, दत्तात्रय खांडेकर यांचेसह सरपंच तानाजी पवार, नितीन सावंत, सुधाकर बोंबाळे, समाधान मगर, विजय पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!