नगर जिल्हा

ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच;राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला दणका

नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक केलेली असताना आता आणखी एका मंत्र्याला ईडीने दणका 

ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच;राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला दणका

नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक केलेली असताना आता आणखी एका मंत्र्याला ईडीने दणका

अहमदनगर :, प्रतिनिधी

ईडीकडून राज्यातील मंत्र्यांवरील कारवाई सुरुच आहे. आता आणखी एका राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची  मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक केलेली असताना आता आणखी एका मंत्र्याला ईडीने दणका दिला आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ती जमीन जप्त केली आहे. त्याशिवाय अहमदनगरमधील साडेचार एकर जमीन जप्त केली आहे. त्या जागेची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. एकूण 13.41 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram