इंदापूरच्या मुख्य बाजारपेठेतील सद् गुरु जनरल स्टोअरला रात्रीच्या सुमारास लागली आग.
मोठया प्रमाणावर दुकानाचे नुकसान.

इंदापूरच्या मुख्य बाजारपेठेतील सद् गुरु जनरल स्टोअरला रात्रीच्या सुमारास लागली आग.
मोठया प्रमाणावर दुकानाचे नुकसान.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी ).
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत अगोदरच मोठ्या प्रमाणात शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रावर दुष्परिणाम झालेला असताना व्यापारी वर्गाला ही मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसलेली होती त्यामध्येच इंदापुरच्या मुख्य बाजारपेठतील सद्गुरु जनरल स्टोअरला दि.१८ जुलै रोजी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली त्यामुळे सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. ऐन संकटाच्या काळात दुकानाचे झालेले मोठे नुकसान पाहता मालक नारायण शेटे-पाटील यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांना दुःख अनावर झाले आहे.
सुदैवाची बाब म्हणजे आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून वेळीच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने पोलिसांच्या मदतीने आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला.