ई-पॉश मशीन व गोदाममधील साठ्यामध्ये तफावत आढळ्यास कारवाई-तालुका कृषी अधिकारी सचिन हाके
खताची विक्री करताना पक्के देयक देण्यात यावे.

ई-पॉश मशीन व गोदाममधील साठ्यामध्ये तफावत आढळ्यास कारवाई-तालुका कृषी अधिकारी सचिन हाके
खताची विक्री करताना पक्के देयक देण्यात यावे.
बारामती वार्तापत्र
विक्रेत्यांनी यूरिया तसेच इतर खतविक्रीबाबत नियोजन करुन ई-पॉश मशीन व गोदाममधील साठ्यामध्ये तफावत राहणार नाही, याबाबत सर्व विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तालुक्यातील खत, बियाणे व कीटकनाशके निविष्ठा विक्रेत्यांसोबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. तालुका गुणनियंत्रक महेश शिंदे, बारामती ॲग्रो डिलर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब मालवदकर यांच्यासह खत विक्रेते आदी उपस्थित होते.
श्री. हाके म्हणाले, ई-पॉश मशीन व गोदाममधील साठा, खत लिंकिंग, ज्यादा दराने खतांची विक्रीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त आल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाही करण्यात येईल, तसेच खताची विक्री करताना पक्के देयक देण्यात यावे. तसेच शेतकरी बांधवांना खत, बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या वापराकरिता योग्य मार्गदर्शन विक्रेत्यानी करावे, असेही श्री. शिंदे म्हणाले.