इंदापूर

ई-श्रम कार्ड मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विकास खिलारे

शेकडो असंघटित कामगार व व्यावसायिकांनी केली नोंदणी

ई-श्रम कार्ड मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विकास खिलारे

शेकडो असंघटित कामगार व व्यावसायिकांनी केली नोंदणी

इंदापूर : प्रतिनिधी

असंघटित कामगार व व्यावसायिकांना ई-श्रम कार्ड महत्त्वाचे असल्याने भारत सरकार मान्यता प्राप्त योजनेचा प्रत्येकाला फायदा व्हावा या उद्देशाने शहरातील प्रभाग क्र.१ महात्मा फुले नगर, दत्त मंदिर येथे मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत ३११ नागरिकांनी नोंदणी केली व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे विकास खिलारे यांनी सांगितले.

सदरील मोहिमेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकास खिलारे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी अनिकेत वाघ, सुधीर मखरे, महादेव लोखंडे, तुकाराम कांबळे, मुकुंद साळुंखे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button