उंडवडीत धनदांगड्यांचा गावठाण जागांवर कब्जा.
अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने स्वतःची पक्की घरे असुन देखील जागा बळकाविल्या जात असून त्यावर बांधकाम करित आहेत.त्यामुळे अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे.
उंडवडीत धनदांगड्यांचा गावठाण जागांवर कब्जा.
बारामती वार्तापत्र
कडेपठार येथील गट नं १७० मधील ४० भूखंडापैकी उर्वरित ८ भूखंडावर आणि जिल्हा अधिकारी पुणे यांनी दिलेल्या ३२ भूखंडातील नियम व अटींचा भंग करुन गेली अनेक दिवसांपासून अतिक्रमण चालू आहेत.अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याने स्वतःची पक्की घरे असुन देखील जागा बळकाविल्या जात असून त्यावर बांधकाम करित आहेत.त्यामुळे अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे.वाढती अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.संबंधित बांधकाम ८-९ महिन्यापूर्वी सुरु असतानाच ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती.कारवाई न करता उलट-सुलट उत्तरे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून दिली जात होती.मागील पंधरा दिवसापुर्वी गटविकास अधिकारी यांनी सांगितले होते कि लवकरच कारवाई होईल परंतु अजुन देखील कोणतीही कारवाई झाली नाही. या कारणास्तव मागील पंधरा-वीस दिवसापूंर्वी उपविभागीय अधिकारी बारामती,तहसीलदार बारामती यांना संबंधित बांधकामास स्थगिती देऊन कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते.निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी बारामती यांनी दिनांक २८/०८/२०२० रोजी गटविकास अधिकारी बारामती यांना पत्राद्वारे गावठाण हद्दीमधील अतिक्रमणांवर व अनधिकृत बांधकामावर नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीने कारवाई करणे आवश्यक असताना प्रकरणी कारवाई झालेली नाही.आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण व बांधकामावर नियमानुसार कारवाई करावी. प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे कळविण्यात आले आहे.परंतु या अतिक्रमणावर अथवा अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई झाली नाही,कायद्याचा कोणताही धाक नसल्याने उलट डबल जोमाने काम चालू आहेत.मागील काही दिवसापूर्वी वाहनतळासाठी असलेले पञ्याच्या शेडच्या जागी आता घराचे बांधकाम चालू आहे. सध्या बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तालुक्यामध्ये सात दिवसांचा जनता कर्फ्यू असताना देखील नियमांचे उल्लंघन करून बाहेर गावावरून मजूर आणून बांधकाम जोमाने चालू आहे. याकडे ग्रामपंचायतीचे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचे बोलले जात असून संबधितांवर नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाईची मागणी देखील होत आजे.तरी या धनदांडग्यांनी केलेल्या बेकायदेशीरित्या अतिक्रमणांवर लवकरात लवकर कारवाई करून गावातील गरीब-गरजू आणि भूमिहीन असणा-या नागरिकांना शासकीय नियमानुसार भूखंड देण्याची मागणी जोर धरत आहे.
फोटो ओळ:- १) मागील काही दिवसापूर्वी या शेडमध्ये वाहनतळ असल्याचे चिञ.
फोटो ओळ:- २) सध्या त्याठिकाणी घराचे बांधकाम सुरू असल्याचे चिञ.
या संबंधित माहितीसाठी उपविभागीय अधिकारी,बारामती यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
मागेच मी ग्रामपंचायतीला कारवाई करण्यास सांगितले आहे.त्यांनी काय कारवाई केली मला डिटेल्स् नाही सांगता येणार मी खाञी करतो.आत्ता पंचनामे चालू असल्याने मी बाहेर आहे.
राहुल काळभोर,गटविकास अधिकारी,बारामती पंचायत समिती.