उजनीत पुन्हा धुमधडाका ; प्रशासनाने नऊ बोटी केल्या उद्धवस्त
वाळू माफियांवर तीन दिवसातील दुसरी मोठी कारवाई

उजनीत पुन्हा धुमधडाका ; प्रशासनाने नऊ बोटी केल्या उद्धवस्त
वाळू माफियांवर तीन दिवसातील दुसरी मोठी कारवाई
इंदापूर : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपूर्वी उजनी जलाशयाच्या क्षेत्रातील गंगावळण भागात अवैधरित्या वाळू उपसा करणार्या सुमारे ४० लाख किंमतीच्या यांत्रिकी बोटी उध्वस्त करण्यात आल्या होत्या मात्र दोन दिवस उलटत नाहीत तोपर्यंतच इंदापूर पोलीस व महसूल विभागाने पुन्हा एकदा सोमवारी ( दि.२ ) पडस्थळ व माळवाडी क्षेत्रातील अवैद्य वाळू उपसा करणार्या सुमारे १ कोटी २० लाख रुपये किंमतीच्या तब्बल नऊ बोटी उद्धवस्त केल्या आहेत.
निर्ढावलेल्या वाळू माफियांकडून उजनी पाणलोट क्षेत्रात महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ टाकत अवैधरित्या वाळू तस्करी निर्धास्तपणे चालू असल्याने पोलीस व महसूल प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आले असून सदरील धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सदरील कारवाईमध्ये तहसीलदार अनिल ठोंबरे,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने,पो.शि अमोल गारुडी,अर्जुन नरळे, सुनील राऊत,समाधान केसकर,राजू नवले,अर्जुन भालसिंग,पो.पाटील राजेंद्र शिंदे,अरुण कांबळे,संजय राऊत यांसह महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होते.