उजनी जलाशय परिसरात पर्यटनातून युवकांना रोजगार संधी : हर्षवर्धन पाटील
उजनी जलाशय परिसरात पर्यटनातून युवकांना रोजगार संधी : हर्षवर्धन पाटील

उजनी जलाशय परिसरात पर्यटनातून युवकांना रोजगार संधी : हर्षवर्धन पाटील
पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत पर्यटनाचा घेतला आनंद
इंदापूर : प्रतिनिधी
उजनी जलाशय परिसरात पर्यटनातून युवकांना रोजगारासाठी अधिकाधिक संधी आहे असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.पर्यटकांचे विशेषत: पक्षी अभ्यासक, पक्षीप्रेमीसाठी पर्वणी असणाऱ्या भिगवण येथील कुंभारगाव परिसरातील फ्लेमिंगोचे पर्यटन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत शुक्रवारी (दि.२५) केले.यावेळी ते बोलत होते.
हिवाळी पर्यटनासाठी उजनी जलाशयाचे भिगवण परिसरातील फ्लेमिंगोचे आकर्षण अनेक देशी व परदेशी पर्यटकांना असते. परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भिगवण येथील कुंभारगाव, तक्रारवाडी, डिकसळ येथे मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो वास्तव्यास येत असतात.
पक्षीमित्रांच्या मनात विशेष ठसा उमटविणारा व आपल्या दिमाखदार शैलीने मन मोहित करणा-या फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबरच सीगल, चित्रबलक, पाणकोंबडया, सर्पमित्र, द्वीमुख यांसारख्या ५० पेक्षाही जास्त जातीचे पक्षी जलाशयावर पाहायला मिळत असल्याने पर्यटकांची पर्वणीच ठरत आहे, संपूर्ण भारतातून पक्षी अभ्यासक या ठिकाणी येत असतात.