उजनी धरणात शंभर टीएमसी पाणीसाठा.
उजनी धरण 69 टक्के भरले.
इंदापूर:-प्रतिनिधी
पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज 100 टी एम सी पाणीसाठा झाला असून, उजनी धरण 69 टक्के भरले आहे, पुणे परिसरात होत असणाऱ्या पाऊसामुळे उजनी धरणात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे, पुणे जिल्ह्यातील बारा धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर काही भरली आहेत, त्यामुळे यापुढील काळातही त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येणार आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी साठ्यात अजुन अधिक वाढ होईल हे नक्कि…
उजनी धरणाची एकूण पाण्याची क्षमता 117 टीएमसी असून सध्या उजनी धरणात शंभर टीएमसी पाणी साठा झालेला आहे व 17 टीएमसी पाणी आल्यानंतर उजनी धरण 100% भरणार आहे, उजनी धरणाची पाण्याची पातळी रोज वाढत असल्याने उजनी वर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उजनी धरणातील आज शुक्रवार ची पाण्याची स्थिती _
– पाणीपातळी : 495.310 मीटर
– एकूण पाणीसाठा : 2841.74 द. ल. घ. मी.
-एकूण टी.एम.सी : 100.34 टी.एम.सी
– टक्केवारी : 69 टक्के
– दौंड विसर्ग : 9 हजार क्युसेक