उजनी धरण 100 टक्के भरले.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
इंदापूर:-प्रतिनिधी
पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज 117 टी एम सी पाणीसाठा झाला असून उजनी धरण 100 टक्के भरले आहे, पुणे परिसरात झालेल्या पाऊसामुळे उजनी धरणात झपाट्याने वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बरीच धरणे भरली असून त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी साठ्यात अजुन अधिकची भर पडत आहे.
उजनी धरणाची एकूण पाण्याची क्षमता 117 टीएमसी असून सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उजनी धरणातील आज सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंतची पाण्याची स्थिती _
– पाणीपातळी : 496.83 मीटर
– एकूण पाणीसाठा : 3320.010 द. ल. घ. मी.
-एकूण टी.एम.सी : 117 टी.एम.सी
– टक्केवारी : 100 टक्के
– दौंड विसर्ग : 23113 क्युसेक
-पुणे बंडगार्डन विसर्ग : 22055 क्युसेक