उजनी पाणलोट क्षेत्रात आढळले दुर्मिळ इंडियन स्टार जातीचे कासव
मासेमारी करणाऱ्या काळे दाम्पत्यानी प्रामाणिकपणे दिली माहिती
उजनी पाणलोट क्षेत्रात आढळले दुर्मिळ इंडियन स्टार जातीचे कासव
मासेमारी करणाऱ्या काळे दाम्पत्यानी प्रामाणिकपणे दिली माहिती
बारामती वार्तापत्र
भिगवण नजीक असलेल्या डिकसळ येथे उजनी पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणारे विनोद काळे व शिवानी काळे हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे डिकसळ भागात मासेमारी करण्यास गेले असता त्यांना कधीही पाहण्यात नसलेले सोनेरी रंगाचे सप्तर्षी आकाराचे कासव दिसल्याने त्यांनी याची प्रामाणिकपणे माहिती पिंटू शिंदे व अंबिका मत्स्यव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष भरत मल्लाव यांना दिली.व हे कासव वनविभागाच्या ताब्यात देण्याबाबत विनंती केली.
इंडियन स्टार टॉरटाइज’ हे दुर्मिळ जातीचे कासव आहे. ते भारत आणि श्रीलंकेत आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे.
दुर्मिळ जातीचे हे कासव बाळगण्यास बंदी आहे. मात्र त्याच्याबाबत अनेक अंधश्रद्धा असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.